Pages
▼
Sunday, 3 February 2019
MPSC & ECONOMICS
राज्यसेवा पूर्वपरीक्षा : अर्थशास्त्र
अभ्यासाची रणनीती ठरवताना जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावर अधिक भर देणे क्रमप्राप्त आहे.
एमपीएससी मंत्र : भूगोल : सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय घटक
एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षा- भूगोल
राज्यसेवा मुख्य परीक्षेत भाषेची बहुपर्यायी, दीघरेत्तरी प्रश्नपत्रिका
विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना सामान्य अध्ययन पेपर- एक मध्ये अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुळात इतिहास, भूगोल, पंचायत राज, सामान्य विज्ञान हे विषय आपण शाळेच्या प्राथमिक स्तरापासून अभ्यासत आलेलो आहोत. त्यामुळे त्या विषयांची भाषा समजून घेणे आपल्याला सोपे जाते; परंतु अर्थशास्त्राची भाषा मात्र तुलनात्मकदृष्टय़ा कठीण वाटते. परंतु एकदा का अर्थशास्त्रीय संकल्पना समजल्या की आपोआपच या संकल्पनांची दैनंदिन जीवनातील घटनांशी सांगड घालायला जमू लागते आणि अर्थशास्त्र या विषयात गोडी वाटू लागते. येत्या १० एप्रिलला होणाऱ्या परीक्षेसाठी अर्थशास्त्राचा अभ्यासाचे नियोजन कसे करावे, त्यातील कोणत्या घटकांवर अधिक भर द्यावा, अभ्यासपद्धती कशी असावी याविषयी आपण या लेखात चर्चा करू या.
अभ्यासाची रणनीती :
अभ्यासाची रणनीती ठरवताना जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावर अधिक भर देणे क्रमप्राप्त आहे. यानुसार दरवर्षी पूर्वपरीक्षेमध्ये साधारणपणे १० ते १५ प्रश्न अर्थशास्त्राशी संबंधित असल्याचे दिसून येते.
या प्रश्नांमध्ये अर्थशास्त्रीय संकल्पना, त्यांचा चालू घडामोडींशी संबंध, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय व्यापार आणि त्याचे इतर आयाम, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाची उद्दिष्टय़े, सहकारी संस्था आणि त्यांचे कार्य, दारिद्रय़, दारिद्रय़ाच्या संकल्पना, दारिद्रय़ रेषा, दारिद्रय़ कमी करण्यासाठीच्या विविध उपाययोजना, त्यासाठी नेमलेल्या समित्या व त्यांच्या शिफारशी, विविध सरकारी योजना त्यांचा उद्देश, लाभार्थी, योजनेचे मूल्यमापन, राष्ट्राच्या आíथक प्रगतीसाठी वित्तनिर्मितीच्या पद्धती, नियोजन आयोग, नीती आयोग, पंचवार्षकि योजना, भूअधिकार सुधारणा धोरण, आंतरराष्ट्रीय परिषदा व त्यांचे मूल्यमापन, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, महिला सक्षमीकरण धोरण, २०११ ची जनगणना, आसियान, संयुक्त राष्ट्र संघटना, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, नाटो, अशा संघटना व त्यांची कामे, दारिद्रय़ निर्देशांक, मानव विकास अहवाल, िलग असमानता निर्देशांक, त्यांची मानके, भारतीय रिझव्र्ह बँक आणि तिचे कार्य, भांडवल बाजार, नाणे बाजार या घटकांचा समावेश होतो. या प्रमुख घटकांना मध्यवर्ती ठेवून आपल्या अभ्यासाची रणनीती ठरविल्यास अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे तारू पलतीराला घेऊन जाणे निश्चितच शक्य आहे.
अर्थशास्त्र आणि आकडेवारी :
राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भात अर्थशास्त्र म्हणजेच आकडेवारी असा गरसमज अनेक विद्यार्थ्यांच्या मनात घर करून बसला आहे. तो दूर करण्यासाठी तुम्हाला केवळ गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणच पुरेसे आहे. मुळात या विषयातील अधिकाधिक प्रश्न हे विविध संकल्पनांवर केंद्रित असतात. जीडीपी, जीएनपी यांच्या व्याख्या जशा महत्त्वाच्या आहेत, तशाच घटक किमती आणि बाजारभावाची संकल्पनाही महत्त्वाची आहे. विविध संस्थांची स्थापना वष्रे तर महत्त्वाची आहेतच, पण त्याचबरोबर नव्याने उदयास येऊन आपले स्थान निर्माण करणारे चिनी युआनसुद्धा महत्त्वाचे आहे. मात्र, जनगणनेच्या अहवालासारखी किंवा मानव विकास निर्देशांकासंबंधीची आकडेवारी तोंडपाठ असणे अत्यावश्यक आहे.
अर्थशास्त्रातील संकल्पना :
स्पर्धा परीक्षांमधील अर्थशास्त्र समजण्यासाठी त्यातील भांडवल बाजार, नाणे बाजार, व्यापार, राजकोषीय धोरण, वित्तीय धोरण, मुद्रा धोरण या संदर्भातील विविध संकल्पना सहज-सोप्या भाषेत समजून घेऊन त्यांची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घातल्यास अर्थशास्त्र अभ्यासणे नक्कीच आनंददायी होऊ शकते.
अर्थशास्त्र आणि स्मरणशक्तीचा वापर
आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्दय़ांची यादी बनवून त्यापकी कोणत्या घटकातील कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत आणि कोणते मुद्दे पाठ करायचे आहेत याचा अगोदरच ठोकताळा बांधून लक्षात ठेवायचे मुद्दे बाजूला लिहून ठेवावेत व पाठांतराच्या मुद्दय़ांची संक्षिप्त टिपणे काढून ती दररोज वाचावीत. त्यामुळे नियमित सराव होऊन या गोष्टी आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहून पाठ होतात. अशा प्रकारे ठरवून अभ्यास केल्यास अर्थशास्त्र नक्कीच तुमचा मित्र बनू शकते.
अशा प्रकारे योग्य मार्गाने ठरवून अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यास नक्कीच या विषयातील दहा ते १५ प्रश्नांना सामोरे जाणे आपल्याला सहज साध्य आहे.

अर्थशास्त्रावरिल कही मराठी पुस्तके
1) अर्थक्षेत्रातील मराठी तारे (उदय कुलकर्णी)
2) गुंतवणूक गाथा (गोपाल गलगली)
3) ग्यानवाचे अर्थशास्त्र (न.वि. गाडगीळ)
4) जागतिक अर्थकारणाचे नवे संदर्भ (सी. पं. खेर)
5) नव्या जगाचे अर्थकारण (डॉ. मधुसूदन साठे)
6) पतसंस्था व्यवस्थापन (डॉ. अविनाश शाळीग्राम)
7) डायमंड बँक व्यवहार व वित्तीय सेवा शब्दकोश (वि.ज. गोडबोले)
8) बँकिंग जिज्ञासा (वंदना धर्माधिकारी)
भटकंती (रमेश पाध्ये)
9) भारतातील बँक कायदे आणि व्यवहार पद्धती (थॉमस दियोग फर्नांडिस)
10) भारतीय अर्थव्यवस्था (सतीश श्रीवास्तव)
मैत्री बँकिंगशी (वंदना धर्माधिकारी)
11) शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (प्रा. नामदेवराव जाधव)
12) संघराज्याचा वित्त व्यवहार भाग १, २, ३ (डॉ. मधुसूदन साठे)
13) सी. ई. ओ. भूमिका व जबाबदारी (माधव गोगटे)
14) सूक्ष्म अर्थशास्त्र (डॉ. पुष्पा तायडे)

कही जगविख्यात अर्थतज्ज्ञ
जॉन मेनार्ड केन्स, कार्ल मार्क्स, रिकार्डो, मिल्टन फ्रिडमन, पॉल क्रुगमन, पॉल सॅम्युएलसन, अमर्त्य सेन.
ॲडम स्मिथ पासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात झाली. माल्थसने समग्रलाशी अर्थशास्त्राची मांडणी केली.
सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेचा अभ्यास केला जातो. मक्तेदारीयुक्त स्पर्धांची संकल्पना व गट संकल्पना या सिंबार्लिनने मांडल्या.
माल्थसच्या मते अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने होते. माल्थसच्या मते लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते.
प्रा मार्शल यांनी १८९०मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनोमिक्स हा ग्रंथ लिहिला.
अर्थशास्त्र म्हणजे काय ?
अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात, व अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असे म्हणतात. हे शास्त्र राष्ट्राच्या संपत्तीचाही अभ्यास करते.
चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. ॲडम स्मिथ यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक समजले जाते. त्यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ १७७६मध्ये लिहिला. त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते.
अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथ यांच्या इ.स. १७७६ मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषांनुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अल्पलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते तर अल्पलक्षी अर्थशास्त्र एखादा माणूस, एखादे कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती देते. अर्थशास्त्र हे कल्याणकारी शास्त्र आहे अर्थिक कल्याण याचा पैशाच्या संदर्भातील मोजमापांशी संबध असतो
सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास ॲडम स्मिथ यांच्यापासून झाला अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयात अनेक घटकचा अभ्यास केला जातो कल्याणाबाबत कसोट्या तयार करणे व अर्थिक धोरणास मदत करणे हे विश्केषणात्मक काम करणार्या अथशास्त्राच्या शाखेस कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. कल्याणकारी शास्त्राची सुरुवात पिंगूनावाच्या अर्थतज्ज्ञाने केली. कल्याण हा शब्द पिंगूनेच मांडला. पिंगूच्या मते राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थिक कल्याणाचे निर्देशक असते..
सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी या संज्ञाचा वापर सर्वात पहिल्यात रॉग्लर फ्रिश यांनी १९३३ साली केला.